बुऱ्हानगर येथे हळदी कुंकू , कर्डिले कुटुंबांची जनतेशी असलेले अतूट नाते…
अहिल्यानगर- बुऱ्हानगर येथे अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त २० हजार सुहासिनींचा गौरव..

सण उत्सव कार्यक्रमातून सांस्कृतिक परंपरेचे जतन – अलकाताई कर्डिले..
मराठी कुटुंबीय वर्षभर विविध सण उत्सव धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करत असतात त्या माध्यमातून आपल्याला लाभलेली महान संस्कृती व परंपरेचे जतन होत असते.
हळदी कुंकू कार्यक्रम हा ग्रामीण भागातील महिलांसाठी एक पर्वणीच आहे जेणेकरून सर्व महिला एकत्र येतात आपल्या विचाराची देवाण-घेवाण करतात व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून वर्षभरात दिवाळी – पाडवा, हळदी – कुंकू संतपूजन आदिसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
त्यामुळे नगर जिल्ह्यासह राहुरी, पाथर्डी, नगर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात हळदी – कुंकू कार्यक्रमानिमित्त 20 हजार सुहासिनींचा गौरव करण्यात आला आहे या माध्यमातून एकमेकींमध्ये ऋणानुबंध, आपुलकी, प्रेम भावना निर्माण होते जनतेचे कर्डिले परिवारावर असलेले प्रेम कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसून येते.
हळदी – कुंकू कार्यक्रमानिमित्त दरवर्षी महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे महिलाच खऱ्या अर्थाने समाजात दिशादर्शक काम करताना दिसत आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडत मुला-मुलींना संस्काराचे धडे देखील देण्याचे काम करत असतात त्यामुळे समाजामध्ये सुसंस्कृत पिढी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन अलकाताई कर्डिले यांनी केले..
बुऱ्हानगर येथे अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त २० हजार सुहासिनींचा गौरव करण्यात आला यावेळी प्रियांका अक्षय कर्डिले उपस्थित होत्या..
कर्डिले कुटुंबांची जनतेशी असलेले अतूट नाते मी गेल्या ३ वर्षापासून पाहत आहे हे भाग्य मला लाभले आहे आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पाहुणचार केला जातो त्यामुळेच जनता मोठ्या संख्येने कार्यक्रमानिमित्त येत असतात हळदी-कुंकू सणानिमित्त राहुरी, पाथर्डी, नगर तालुका व शहरांमधून महिला येतात त्यांना वाणाचे वाटप केले जाते आपल्याला लाभलेली सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचे काम होत असल्याचे मत प्रियंका कर्डिले यांनी व्यक्त केले..