ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करा – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

अहिल्यानगर - चहा या नवीन दालनाचे उदघाटन

कोहिनुर मॉल समोर, नगर मनमाड रोड येथे चंद्रपूर येथील आपला चहा चे दालनाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांचे हस्ते झाले या वेळी आपला चहा चे संचालक सोनल डेंगळे, नगर शॉप चे संचालक मनोज चव्हाण, सौ. निशा चव्हाण, सहजयोगी राहुल सातपुते, वाय प्रकाश टेलर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना बोज्जा म्हणाले सध्याच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे अवघड आहे त्या साठी मोठया प्रमाणात कष्ट करावे लागते तरी सुद्धा यश मिळेलच असे नाही त्या मुळे नोकरी मागे न लागता व्यवसाय करा असे आवाहन केले.

या वेळी आपला चहा चे संचालक सोनल डेंगळे यांनी माझा ब्रँड नागपूर मध्ये असून मी आता पर्यंत 26 शाखा उघडले आहेत पहिल्यांदाच विदर्भ मधून पश्चिम महाराष्ट्र मध्ये पहिलीच शाखा उघडली असून नक्कीच आपला चहा नगरकर पसंती देतील असा विश्वास दिला.

या वेळी मा.नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांनी चव्हाण यांना शुभेच्छा दिले. शेवटी नगर शॉप चे संचालक मनोज चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे