ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात फ्लॅटच्या नावाखाली नोकरदाराची 18 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर

फ्लॅट देण्याच्या नावाखाली एका नोकरदाराची 18 लाख रूपये फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संदीप श्रीमल भळगट (वय 42 रा. सिव्हील हाडको, अहिल्यानगर)  असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशश्री कन्स्ट्रक्शनचे मनिष शेषमल भंडारी (रा. माळीवाडा, अहिल्यानगर) व वैशाली राजकुमार सोनसळे (रा. सोहम हेरीटेज भक्ती मंदिर रस्ता, पांचपगठी, ठाणे वेस्ट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 2013 मध्ये संदीप भळगट यांनी सारसनगर येथील समृध्दी एन्क्लेव्ह येथील फ्लॅट क्र. 204 विकत घेण्यासाठी यशश्री कन्स्ट्रक्शन सोबत व्यवहार केला. त्यांनी एचडीएफसी बँकेच्या चेक व कर्जाच्या माध्यमातून एकूण 18 लाख रुपये दिले होते. त्यांनी सांगितलेल्या फ्लॅट क्र. 204 चे खरेदीखत नोंदवून देण्यात आले, परंतु जेव्हा संदीप भळगट यांनी फ्लॅटचा ताबा मागितला, तेव्हा त्यांना कळाले की सदर फ्लॅट आधीच रमणलाल गांधी यांना विकला गेला होता.

त्यानंतर, मनीष भंडारी यांनी चुकून फ्लॅट क्र. 204 चा उल्लेख केला असल्याचे सांगितले व चूक दुरूस्तीचा दस्त तयार केला. तरीही, त्यांना फ्लॅट क्र. 203 चा ताबा दिला नाही. तो फ्लॅटही साळवे कुटुंबियांना विक्री केला असल्याचे तपासणीतून समोर आले.

मनिष भंडारी व वैशाली सोनसळे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप भळगट यांनी केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे