ब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ असायला हवे…

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी ‘जन गण मन’ हे स्तुती गीत लिहिले. त्यामुळे ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रगीत असायला हवे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमात केले.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, ‘आपण ‘जन गण मन’ गातो. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी त्यावेळचे ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिले होते. त्यांना त्यासाठी नोबेल पुरस्कारही मिळाला. म्हणूनच राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ असायला हवे.