ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

कौन बनेगा करोडपतीमधुन बोलतोय तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे असे सांगुन ठकविणारा आरोपीस अटक

अहिल्यानगर

दिनांक १/८/२०२२ रोजी फिर्यादी नारायण अरुणे रा.वॉर्ड नंबर १७, लक्ष्मी माता मंदिर जवळ, रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर यानां दिनांक २०/८/२०२१ ते दिनांक १०/३/२०२२ या कालावधीत अनोळखी मोबाईल नंबर ८२९१८२२९१९, ९८६७८८२९३०, यावरुन व्हॉटसअॅप कॉलवरुन कॉल करुन माझा विश्वास संपादन करुन, खोटे सांगुन, मला वेगवेगळे प्रोसेसिंग फिचे नांवाखाली मला त्यांचे फोन पे अकांऊट नंबर ७०२१२५९०१५ यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडुन एकुण १३३२००/- रुपयाची फसवणुक केली आहे. त्यावरुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलीस स्टेशन ागुरनं ४४/२०२२ भादंवि कलम ,४१९,४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० चे कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तदनंतर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीचा मोबाईल नंवर, बैंक अकांऊट वरुन आरोपी फैसल ईकवाल मेमन रा. मेमन मंजिल वाली पिर रोड, कल्याण ठाणे, निअर मुंबई येथे रहात असल्याचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाव्दारे निष्पन्न झाले आहे. आरोपीचा शोधार्थ वेळोवेळी कल्याण ठाणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळुन आला नाही तदनंतर आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी दिनांक ६/१/२०२५ रोजी मिळुन आल्याने त्यास गुन्हयामध्ये दिनांक ६/१/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीची दिनांक ८/१/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.

नागरीकांना अहवान करण्यात येते की, कोन बनेगा करोड पती वामधून आपणास २५ लाख रुपयेची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन KYC अपडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिग अॅप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो असे वेगवेगळया आमिषाला वळी पडु नये प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर १९३० यावर तक्रार करावी.

सदरची कामगिरी मा.श्री. राकेश ओला सो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मोरेश्वर पेंदाम, पोसई योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले,अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ,दिपाली घोडके, यांनी केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे