
“प्रत्येक पहाट ही खूप सुंदर आणि मनमोहक असते. आणि त्यांच पहाटे बागेत फुललेली फुलं आणि त्या फुलावर मधुर गुंजन करणारे पक्षी रंगबेरंगी फुलपाखरं,हे सार मनाला प्रसन्न करत असतं.. त्यामुळे मला फुलं खूप आवडतात आणि फुलाचे व्यापारी असणारे महात्मा फुले माझे आदर्श आहे. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोऱ्हे हे होतं.
पण फुले विकण्याच्या व्यवसायामुळे त्यांना लोकांनी फुले हे नाव दिलं. खरं तर पुण्यात फुले विकणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेमुळे प्रत्येक स्त्रीच्या अंगावर फुले पडली.आणि प्रत्येक स्त्री यशस्वी झाली.. यांच श्रेय फुलेना जातं.. म्हणून बागेत फुललेली सुंदर फुलं आणि महात्मा फुले हे मला खूप आवडतात..!
खरं तर प्रामाणिक व्यक्ती आणि सत्त्यवाद्याना खूप त्रास सहन करावा लागतो. अश्याची बदनामी करण्याचे डाव वेळोवेळी आखल्या जातात.स्त्री शिक्षणाची मुहूतपेढ आपल्या देशात रोवणाऱ्या फुले दाम्पत्याला खूप त्रास सहन करावा लागला. लोकांनी सावित्रीबाईच्या अंगावर दगडधोंडे फेकून मारले.महात्मा फुलेनाही जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि सत्त्याने अंतिमतः त्यांना विजयी केल. आणि फुले परिवाराच नाव इतिहासात सोनेरी अक्षराने लिहलं गेलं. हा सत्त्याचा अंतिम विजय होता..
“क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले” हे महत्वपूर्ण पुस्तकं अलीकडे माझ्या हाती आलं.. खरं तर फुले वाचतांना एक गोष्ट प्रखरपणे वाचण्यात आली कीं,1जानेवारी 1848ला महात्मा फुले यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलीची 1ली शाळा सुरु केली..
11एप्रिल 1827 मध्ये जन्मलेले महात्मा फुले 1848मध्ये अवघे 21वर्षाचे होतें.. विचार करा अवघ्या 21व्या वर्षी फुलेनी भारतातील 1ली मुलीची शाळा काढून इतिहासाच्या पानावर आपलं नाव कोरल… विचार करण्याची गोष्ट आहे 21व्या वर्षी फुले मुलीची 1ली शाळा काढतात. आणि आजचा 21वर्षाचा तरुण कायं करतोय??कुठे होतें महापुरुष..? आणि कुठे आहोत आपण?हा प्रश्न सुज्ञ जनानी स्वतः ला विचारला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोकं इतिहास विसरतात,ते लोकं इतिहास घडवू शकतं नाही.. आजच्या बाजारीकरणाच्या जगात आपण आपला इतिहास विसरत चाललो आहे.. म्हणून इतिहास वाचा नव्या प्रेरणा आणि नवा आदर्श मिळेल….
आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस
आहे.सावित्रीबाई फुले यांचा जन्म आज दि.3जानेवारी 1831मधील झाला त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते नंतर 1840मध्ये सावित्रीबाईचा विवाह ज्योतिबा गोऱ्हे यांच्यासोबत झाला यांच गोऱ्हे कुटूंबाला फुलांच्या व्यवसायामुळे फुले हे नाव पडलं.. मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी 1जानेवारी 1848मध्ये काढली या शाळेच्या पहिल्या मुख्याद्यापिका होत्या सावित्रीबाई फुले..
ज्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तपेढ रोवली असं म्हणतात की जेव्हा त्या मुलींना शिकवण्यासाठी जातं होत्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगडधोंडे, शेण,माती फेकत होते एकदिवशी एका व्यक्तीने सावित्रीबाईला दगड फेकून मारला आणि त्यामुळे त्यांच डोकं फुटलं त्या रक्तबंभाळ झाल्या तरीही त्यांनी आपल काम सोडल नाही.. सत्त्यवाद्याच्या वाट्याला असा संघर्ष आलेला आहे..
1890 मध्ये महात्मा फुलेच्या निधनानंतर फुलेची अपूर्ण चळवळ सावित्रीबाईने पुढे नेली..1897ला पुण्यात प्लेगची साथ पसरली अश्या वेळी सत्त्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली असंच एकदा एका प्लेग झालेल्या मुलांना दवाखान्यात नेत असताना सावित्रीबाईला सुद्धा प्लेग झाला. आणि10 मार्च 1897 मध्ये त्यांच निधन झालं..
गोरगरीब, अनाथ स्त्रियासाठी ज्योतिबाची सावित्री आयुष्यभर झीजली आणि त्यातच तीची प्राणज्योत विझली.. अश्या या महान स्त्रीला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…!”