ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर -कल्याण रोडवरील होलसेल फटाका मार्केट सुरु

कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे केल्यास यश निश्चित मिळते - श्री आदित्यनाथ महाराज

सालाबाद प्रमाणे दिवाळी सणा निमित्त कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे वतीने जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका विक्री मार्केटचे उदघाटन श्रीविशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य श्री आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते फीत कापून फटाका विक्री मार्केटचे व प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेश जाधव,सहसचिव अरविंद साठे कोषध्यक्ष शिवराम भगत आदींसह सदस्य उपस्थित होते.

अध्यक्ष राशीनकर म्हणाले, नगर कल्याण रोड वरील फटाका मार्केट हा जिल्ह्यातील एकमेव होलसेल मार्केट असून पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. सर्वात कमी दरात येथे फटाके मिळत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी फटाके खरेदीसाठी याच मार्केटवर अवलंबून असतात.

या वेळी असोसिएशन चे माजी अध्यक्ष व सचिव श्रीनिवास बोज्जा म्हणाले जिल्ह्य प्रशासनान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फटाका विक्रीचे परवाने मिळणे कामी सहकार्य केले असून फटाका असोसिएशनचे वतीने वर्षभर सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन विविध कार्यक्रम राबवत असल्याने प्रशासनही आम्हाला सहकार्य करत आहे.

यावेळी आदित्यनाथ महाराज यांनी कोणताही व्यवसाय हा प्रामाणिक पणे केल्यास यश निश्चित मिळते या साठी व्यापारी भावना ठेवून व्यवसाय करावा असे आवाहन करून मी सर्वांचा व्यवसाय चांगला होवो यासाठी श्री विशाल गणेश चरणी प्रार्थना करतो असे म्हणून शुभेच्छा दिल्यात . शिवराम भगत यांनी प्रास्ताविक केले, अरविंद साठे यांनी आभार मानले.

यावेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देवीदास ढवळे, माजी उपाध्यक्ष कैलास खरपूडे, संजय सुराणा, अमोल तोडकर, दाजी गारकर, संभाजी कराळे, विकास पटवेकर, विजय मुनोत, उमेश क्षीरसागर, सागर हरबा, अविनाश जिंदम अभय बोरुडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे