आजोबाच्या (आईचे वडील) संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो ? मालमत्तेचा कायदा सांगतो की…..
आपल्या देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. अनेकदा छोटे मोठे वाद विवाद भांडणांमध्ये परावर्तित होतात आणि भांडणे अशी प्रकरणे न्यायालयात घेऊन जातात. खरे तर अनेकांना संपत्ती विषयक कायद्याची फारशी माहिती नसते आणि याच कारणांमुळे संपत्तीवरून वादविवाद होतात..

आजोबाच्या (आईचे वडील) संपत्तीत नातवाचा अधिकार असतो का ? नातू आपल्या आजोबांच्या संपत्तीवर दावा ठोकू शकतो का असे काही प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक याच बाबींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय कायद्यात याबाबत काय तरतूद आहे हे कायदे तज्ञांच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत. खरंतर आपल्या देशात संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. अनेकदा छोटे मोठे वाद विवाद भांडणांमध्ये परावर्तित होतात आणि भांडणे अशी प्रकरणे न्यायालयात घेऊन जातात.
खरे तर अनेकांना संपत्ती विषयक कायद्याची फारशी माहिती नसते आणि याच कारणांमुळे संपत्तीवरून वादविवाद होतात. यामुळे आज आपण संपत्ती विषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या बाबीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आजोबाच्या संपत्तीत नातवाचा किती अधिकार असतो.
हिंदू कायद्यांतर्गत हक्क
जर तुम्ही हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 अंतर्गत समाविष्ट असाल तर, तुमच्या आजोबांच्या मालमत्तेवर तुमचा हक्क हा मालमत्ता ही वडिलोपार्जित आहे की स्व-अधिग्रहित आहे यावर अवलंबून राहणार आहे. मालमत्तेचे दोन प्रकार असतात.
पहिला प्रकार म्हणजे वडीलोपार्जित आणि दुसरा म्हणजे स्व-अधिग्रहित. वडीलोपार्जित म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे येणारी मालमत्ता. दुसरा प्रकार म्हणजे स्वधिग्रहित अर्थातच स्वतःने कमावलेली संपत्ती.
भारतीय कायद्यानुसार, तुमच्या आजोबांचा त्यांच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेवर पूर्ण अधिकार आहे. ते ही मालमत्ता किंवा त्याचा भाग एखाद्याला इच्छापत्र किंवा भेटवस्तू द्वारे देऊ शकतात. जर तुमचे आजोबा मृत्युपत्र न बनवता मरण पावले, तर हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मालमत्ता कायदेशीर वारसांमध्ये वाटली जाते.
या प्रकरणातील कायदेशीर वारसांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. पहिले प्राधान्य : तुमच्या आजोबांच्या मालमत्तेतील पहिले प्राधान्य त्यांच्या मुलांना (तुमची आई आणि तिची भावंडे) आणि तुमच्या आजीला जाईल.
दुसरी पसंती : जर मुले मरण पावली असतील तर नातवंडांना दुसरे प्राधान्य दिले जाईल. या प्रकारच्या संपत्तीत नातू आपल्या आजोबाच्या संपत्तीवर दावा ठोकू शकत नाहीत. पण, जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर तिचे मालकी हक्क सर्वायव्हरशिप अधिकारांतर्गत हस्तांतरित केले जातात.
हिंदू कायद्यानुसार, नातवंडांना मालमत्तेवर हक्क सांगता येतो जेव्हा त्यांच्या मुलांना मालमत्तेचा वारसा मिळाला असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क असेल.
जर तुमच्या आईला मालमत्तेचा वारसा मिळाला असेल किंवा त्यात हिस्सा असेल तर तिला (आईला) या मालमत्तेची मालकी तुमच्याकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. जर तुमचे नाव मृत्युपत्रात समाविष्ट असेल, तर तुम्हाला त्या मालमत्तेवर अधिकार असतील.