ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

रिल्स बनविणाऱ्यांनी विनोदा ऐवजी सामाजिक विषयावर रिल्स बनवा – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा 

अहमदनगर

सध्या सोशल मीडिया वर मोठया प्रमाणात रिल्स चे बनवितात परंतु हे रिल्स विनोदावर अवलंबून असतात या ऐवजी सामाजिक विषयावर रिल्स बनवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.

रिल्स बनविण्याचे फैड मोठया प्रमाणात झाले असून गल्ली बोळामध्ये लहान मुला पासून तर मोठया पर्यंत रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकत आहे. या रिल्सचे सर्व विषय हे विनोदी असतात व रिल्स पाहणारे ही अत्यंत आतुरतेने हे रिल्स पाहून पण आनंद घेतात. परंतु जर हे रिल्स सामाजिक विषयावर काढण्यात आली तर नक्कीच एक समाज प्रबोधनाचा कार्य यांच्या कडून होईल.

नुकतेच एका रिल्स मध्ये आई वडील मोबाईल घेऊन बसतात म्हणून मुलगा ही मोबाईल घेऊन बसतो नंतर वडील मोबाईल सोडून पुस्तक हातात घेतात, पत्नी च्या हातात पुस्तक देतात हे पाहून मुलगा ही पुस्तक हातात घेतो. अश्या प्रकारे समाजात बदल घडवून आणवयाचे असेल तर अनेक सामाजिक विषयावर रिल्स बनवून प्रबोधन करता येईल. सध्या सोशल मीडियावर रिल्स पाहणाऱ्यांचे प्रमाण फार मोठया प्रमाणात वाढले असल्याने याचा उपयोग समाज परिवर्तन होण्यासाठी समाजात चांगले गुण प्रस्थापित होण्यासाठी चांगले रिल्स कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.

अश्या पद्धतीने समाजा मध्ये चांगल्या सवयी लावण्यासाठी समाज प्रबोधन रिल्स बनवावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे