रब्बी ज्वारीच्या पिकावर अमेरिकन लष्करी अळी रोगाचा प्रार्दुभाव
बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी - लातूर

डिगोळ परिसरातील शेतकरी संकटात
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला असला तरी यंदा रब्बी पिकाच्या हंगामातील पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा जोर वाढला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील बडी (जोंधळा)ज्वारी गव्हू करडी हरभरा हि पिके घेतली असून जास्त पेरा ज्वारीचा झाला आहे या ज्वारीच्या पिकावर पाने कातरणारे किडे व पोंगयामध्ये अमेरिकन लष्करीअळीने पोंगे कातरली जात असल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे.
गतवर्षी पेक्षा यावर्षी वातावरणातील बदलामुळे डिगोळ परिसरात आधीच हरभरा पिकावर मुरकोज नावाचा रोग झाला आहे तर गव्हाच्या पिकावर मर रोगाचा प्रार्दुभाव झाला असल्याने पिके पिवळी पडुन वाळून जात आहेत तर बडी ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करीअळीचा रोग पडला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एका नव्या संकटात सापडले आहेत.
डिगोळ व परिसरात यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने विहीरी , बोअर व नदी – नाले तुंडुब भरले नसल्याने जलस्ञोताची पाणी पातळी वाढली नाही . कमी पाण्यावर या परिसरातील शेतकरी सिंचनद्वारे रब्बी पिकासह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. तथापी वातावरणातील बदलामुळे शेतकरी शेतकर्यांना नैसर्गीक संकटाने चांगलेच घेरले आहे .
खरिप हंगामात ही एकही मोठा पाऊस झाला नसल्याने उडीद मुग व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले . आत्ता उपलब्ध पाण्यावर शेतकरी खरिप हंगामातील नुकसान भरपाई काढण्यासाठी रब्बी पिकासह भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती करण्याचा पर्यत्न करित आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासुन वातावरणातील बदलामुळे दिवसा कडक उन्ह , राञी कडक थंडी तर पहाटे धुके पडत असल्याने याचा अनिष्ट परिनाम रब्बी पिकावर होत आहे . सुरवातीला हरभरा पिकावर मुळकुज रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने हरभरा पिके हातची गेली . तर आता गव्हु पिकावर मर रोगाचा प्रार्दुभाव वाढु लागला आहे. यामुळे हे पिक पिवळे पडुन सुकुन जात आहेत तर आता बडी ज्वारीवर अमेरिकन लष्करीअळीचा मोठ्या प्रमाणात रोग पडला असल्याने शेकडो एकरावरील बडी ज्वारीच्या पिकावर रोग पडल्याने पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले आहे .
टिप..संभाजी सुर्यवंशी
कुर्षीसहायक डिगोळ..
हरभरा , गव्हु व ज्वारीच्या पिकावर रोगाचे आक्रमन वाढले आहे . लातूर जिल्ह्यात रबी ज्वारीवर मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्राधुर्भाव झाल्याचे दिसत असून व्यवस्थापनासाठी क्लोरअन्ट्रॅनिलीप्रोल १८.५% – ०.४ मिली किंवा थायोमेथॉक्झॅम १२.६०% + लैमडा सायहॅलोथ्रीन ९.५०% – ०.५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७% – ०.५ मिली किंवा नोव्हालोरॉन 5.25% + इमामेक्टिन बेंझोएट 0.9% एससी – २.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फोंग्यात फवारणी करावी. अशी माहिती शेतकऱ्यांना संभाजी सुर्यवंशी यांनी दिली.