ब्रेकिंगमहाराष्ट्र
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
अकोला- चायना मांजामुळे पशु पक्षांसह माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत.

चायना मांजामुळे पशु पक्षांसह माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. या आधारावर जिल्हा प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. घातक असलेला चायना मांजाची विक्री करणाऱ्यांवर अकोला पोलिसांनी कारवाई केली. अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिसांनी दोन विक्रेत्यांसह मोठ्या प्रमाणात चायना मांजा जप्त केला आहे.
अकोल्यातील तेलीपुरा चौकातील गोल्डन पतंग सेंटरमध्ये हा चायना मांजा जप्त करण्यात आला. मुकिम अहमद आणि संतोष ठाकूर यांच्यावर चायना मांजा विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चायना मांजाचा वापर टाळावा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.