ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यातील रमणबाग शाळेचा अनोखा उपक्रम..गणित दिनानिमित्त ‘सममिती’ या गणितातील संकल्पनेवर आधारित 20 फुटी भव्य प्रतिकृती साकार

पुणे

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य,शालासमितीचे वित्त नियंत्रक व फर्ग्युसन कॉलेज मधील गणिताचे व्यासंगी प्राध्यापक विद्यावाचस्पती विनयकुमार आचार्य तसेच खरगपूर आय आय टी मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी विद्यावाचस्पती स्वानंद खरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रशालेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचे स्वागत केले.डॉ. विनयकुमार आचार्य यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील योगदानाबद्दल सांगताना आज विविध ठिकाणी गणिततज्ञ असलेल्या प्रशालेच्या व अन्य ठिकाणी गणित क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची माहिती सांगितली. तसेच गणिते सोडवताना गणिताचे पुस्तक वाचले पाहिजे असा संदेश दिला.

डॉ.स्वानंद खरे यांनी गणित सोडवण्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी तर्कशुद्ध विश्लेषण करण्याची क्षमता भावी आयुष्यात उपयुक्त असल्याचे सांगितले.

प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याला श्रीनिवास रामानुजन यांचे जीवन चरित्र असलेली व गणिताच्या काही गमतीदार कृती असलेली छोटेखानी पुस्तिका या दोन गणित तज्ञांच्या हस्ते प्रकाशित करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मोफत वितरित करण्यात आली.या पुस्तिकेचे लेखन ज्येष्ठ गणिती नागेश मोने यांनी केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे भूमितीतील ‘सममिती’ ही संकल्पना स्पष्ट करणारी २०×२० ची भव्य प्रतिकृती शाळेच्या फरसबंद चौकात साकारण्यात आली. ही कल्पना गणित विषयाच्या शिक्षिका दीपाली सावंत आणि दीप्ती डोळे यांनी मांडली.

गणित विषयाच्या हस्तलिखिताचे व गणितातील आकृतींचे प्रकाशन करण्यात आले.प्रशालेत आयोजित गणिताच्या विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यातआली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पडदूणे यांनी तर आभारप्रदर्शन अनघा काकतकर यांनी केले.सारिका रणदिवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

शाळेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर अंजली गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणित शिक्षकांनी गणित दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे