महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा साई चरणी नतमस्तक, संस्थानला नवीन प्रकल्पासाठी सीएसआर फंडातून करणार मदत
शिर्डी - महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी आज शिर्डीमध्ये साई दर्शन घेतलं. लवकरच महिंद्राचं नवीन वाहन लॉन्च होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी आज साईदर्शन घेतलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच आपलं नवीन चारचाकी वाहन बाजारात उतरवणार आहे. परंपरे प्रमाणे ते मॉडल साई चरणी दान म्हणून सुरुवातीला अर्पण करणार आहे.
साईबाबा संस्थानच्या येणाऱ्या नवीन प्रकल्पासाठीही सीएसआर फंडातून मदत करणार असल्याचं महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यानी आज साई दर्शनानंतर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय.
प्रसिद्ध उद्योगपती महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा आपल्या कंपनीचं प्रत्येक नवीन लॉन्च होणारं पाहिलं वाहन साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात देत असतात. तसंच न चुकता दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. आजही आनंद महिंद्रा यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर शिर्डीत येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने साईंची मूर्ती आणि शॉल देवून आनंद महिंद्रा यांचा सत्कार करण्यात आलाय.
यावेळी साईबाबांचे प्रभारी मुख्य कार्यकारी बाळासाहेब कोळेकर, प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी मंदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
महिंद्रा अँड महिंद्रा फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षी साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलकरता सुमारे 75 लाख रुपये किंमतीचे डिजिटल सिस्टीमचे पोर्टेबल एक्स-रे मशिन देणगी स्वरुपात दिले होते.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने कुठलेही नवीन वाहन लॉन्च केल्यानंतर पहिले वाहन साई संस्थानला देणगी स्वरूपात ते देत असतात. आजपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जवळपास 15 वाहने साई संस्थानला भेट स्वोरूपात दिली आहेत. या वाहनांना साई संस्थान आपल्या कार्यालयीन कामाकरता वापरत असल्याचं साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं.