ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत ? पुण्यातील ‘या’ नयनरम्य ठिकाणांना एकदा आवर्जून भेट द्या, भान हरपून जाल ही गॅरंटी

पुणे

सध्या विंटर हॉलिडेची धूम आहे. विंटर हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत तसेच मित्रांसमवेत विविध पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. तसेच वन डे पिकनिकसाठीही अनेकजण बाहेर जात आहेत.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कुठे बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. कारण की आज आपण पुण्यातील अशा तीन ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत सुट्ट्या एन्जॉय करू शकतात.

आज आपण पुण्यातील सनसेट पॉईंट साठी फेमस असणाऱ्या तीन ठिकाणांची माहिती पाहणार आहोत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सनसेट पॉईंटवर उभे राहून मावळत्या सूर्याचे दर्शन घेणे, त्याचे मनमोहक सौंदर्य पाहणे अनेकांना आवडते.

सिंहगड : सिंहगड किल्ला हे पुण्यातील एक महत्त्वाचे आणि अगदीच नयनरम्य असे डेस्टिनेशन. पण, हे ठिकाण पुण्याच्या बाहेर आहे. हे ठिकाण पुण्याच्या बाहेर असले तरी देखील तुम्ही या ठिकाणी वन डे पिकनिक चा प्लॅन बनवू शकता. सिंहगड किल्ल्यावरून सनसेट पाहणे खूपच अद्वितीय अनुभव देते.

जर तुम्हीही येत्या वीकेंडला पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर सिंहगड किल्ला हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. विशेषता तुम्हाला सनसेट बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.

कुलागड : सिंहगड रस्त्यावरील हे ठिकाण पुणेकरांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र जर तुम्ही पुण्याबाहेरील असाल आणि पुणे एक्सप्लोर करण्यासाठी जात असाल तर कुलागड एकदा नक्कीच एक्सप्लोर करा.

या गडावर देखील सिंहगडाप्रमाणेच सूर्यास्ताचा नजारा पाहायला मिळतो. येथून सूर्यास्ताचा नजारा फारच सुंदर दिसतो. येथून सूर्यास्ताचा नजारा पाहणे फारच रोमहर्षक आणि आनंददायी आहे.

वडगाव धरण : वन डे पिकनिक साठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे वडगाव डॅम. पुण्याबाहेर असणारे हे ठिकाण पर्यटकांमध्ये नेहमीच आकर्षणाचा विषय राहिले आहे. कारण म्हणजे या ठिकाणी असणारी अफाट शांतता. शहरातील गोंगाटापासून थोडा वेळ रिलॅक्स करण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

वडगाव धरणाच्या काठावर बसून तुम्ही जर एकदा सूर्यास्ताचा नजारा पाहिला तर तुम्ही भान हरपून जाल. या धरणाच्या काठावर बसून सूर्यास्ताचा नजारा पाहणे खूपच रोमहर्षक आणि मनाला आनंद देणारे असते. हेच कारण आहे की अनेक जण या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी गर्दी करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे