ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी ताराबाद रोडवर एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

न्यूज प्रतिनिधी - संगीता खिलारी

पोलीस तक्रार झाली ..आणि राहुरी ताराबाद रोडवर नगर जिल्ह्यातील राहुरी येथे धक्कादायक असा प्रकार समोर आला..

राहुरी ताराबाद रोडवर घोरपडवाडी घाटात 13 तारखेला सकाळी नऊच्या सुमारास एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार भाऊसाहेब कचरू ब्राह्मणे वय 67 राहणार चिंचोली फाटा असे मयत व्यक्तीचे नाव असून परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी हा मृतदेह पाहिला आणि त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याला या संदर्भात माहिती दिली.

मयत व्यक्ती जवळ दुचाकी गाडी विषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आलेली असून राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात हरवलेला आहे.

खिशातील कागदपत्रांवरून व्यक्ती यांची ओळख पटलेली असून अहमदनगर जिल्हा व सरकारी बँकेतील निवृत्तकर्मचारी होते. राहुरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्या प्रकरणी देखील तक्रार दाखल करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे