देहूगाव विठ्ठलवाडी येथील कवयित्री मेहमूदा रसुल यांचा ७ वर्षाचा नातू मो. लिबान फिरोज शेख याने आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला.
देहूगाव - पुणे

देहूगाव विठ्ठलवाडी येथील कवयित्री मेहमूदा रसुल यांचा ७ वर्षाचा नातू मो. लिबान फिरोज शेख याने अल्लाह प्रती आपली श्रद्धा प्रकट करीत आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला.
रमजान मध्ये २७ वा रोजा(उपवास) हा खूप मोठा मानला जातो..यावर्षी दोन मार्चपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे .
घरातील मोठ्यांसोबत मोहम्मद अर्श फारूक शेख-११,उमेर फारूक शेख-७, लिजा फातिमा फिरोज शेख-१०, कैफा निसार शेख – ५ या सर्व चिमुकल्यांनी रोजाची सुरुवात केली.
सकाळी सेहरी करून रोजा (उपवास) धरला दिवसभर धार्मिक ग्रंथ व नमाज पठण करत आपली अल्लाह (ईश्वर) प्रति श्रद्धा प्रकट केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील शेख फारूक, शेख फिरोज वडील, शेख निसार चाचा (काकी) जाहिरा शेख, आई बुशरा शेख, चाची कौसर शेख व आजोबा रसुल शेख, रशीद धोंडफोडे, हमिद धोंडफोडे व शेख पठाण व सर्व मित्र मंडळी आप्तेष्टांनी या चिमुकल्यांना शुभार्शिवाद दिले व कौतुक केले.