लकाकी फाउंडेशनच्या कुटुंब वृध्दाश्रमास सुजाता पायमोडे यांची वस्तू स्वरूपात मदत
अहमदनगर प्रतिनिधी

लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रम ही संस्था मा. शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले.
लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रम सुरु केलेल्या वृध्द-आश्रमच्या उद्घाटन प्रसंगी सुजाता पायमोडे यांनी २ डायनिंग टेबल देऊन मदत केली.आणि तेथील परिस्थिती आणि कामाचे स्वरूप, नियोजन पाहुन लगेच त्यांनी वृध्दां साठी जेवायला २ डायनिंग टेबल ची मदत घोषित केली.
संस्थापक उमा बडगू व सारीका सिद्धम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.
सुजाता ताई या प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्या वेगवेगळ्या सामाजिक ठिकाणी जाऊन तेथील लोकांना, मुलांना चित्रकलेचे फ्री सेशन घेतात.त्या बरोबर च त्यांच्या मनातील भावना त्या चित्रात उतरायला लावतात. याच कारणांमुळे त्या लोकांच्या चेहर्यावर एक उमेद त्या बघतात.
सुजाता ताई यांनी उमा बडगु व सारिका सिद्दम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.