ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी देवाला साकडे – दगडूशेठ गणपती, जेजुरीच्या खंडोबाला अभिषेक, मुंबईत नमाज पठण

भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी. या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळावे, यासाठी देशभरात सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. नागपूर येथील टेकडीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य यज्ञ सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात अभिषेक आणि पूजा करण्यात आली आहे. तसेच, मुंबईत मुस्लिम महिलांकडून नमाज पठण करण्यात येणार आहे.

बाप्पाच्या मुकुटावर चंद्रकोर

आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे, यासाठी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही विविध फळांचे रस, सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला.

याशिवाय गणपती बाप्पाच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.

संपूर्ण जगाचे लक्ष

चांद्रयान 3 च्या चंद्रावर लॅंडिंगची वेळ आता जवळ आली आहे. चांद्रयान बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल.

चांद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

चांद्रयानाने 14 जुलैला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या शक्तीपेक्षा सहा पटीने कमी आहे. त्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यातच इस्रोने चांद्रयानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकलेले नाही.

चांद्रयान-3 आज सायं. 6:04 वा. चंद्रावर लँडिंग करेल.

शेवटची 15 मिनिटे सर्वात महत्त्वाची, PM मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होतील.

नुकतेच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले. त्यामुळे आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे