
विश्व निर्मल फौंडेशनच्या वतीने बोज्जा यांचा सत्कार
विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल च्या वतीने आझादी की अमृत महोत्सवातंर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणारा ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ विश्व निर्मल फौंडेशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना मिळाल्या बद्दल संस्थेचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ.पारगावकर म्हणाले श्रीनिवास बोज्जा हे आमचे संस्थेचे अध्यक्ष असून त्यांचे कार्य हे प्रामाणिक आहे. त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणूनच दिल्ली सरकारचा पुरस्कार मिळाला.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना बोज्जा म्हणाले देशासाठी समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो याचे भान प्रत्येक नागरिकांनी ठेवायला हवी. माझा सत्कार हा मला ऊर्जा देण्याचे काम करेल. या पेक्षाही जास्त काम या पुढे करणार असल्याचे श्री. बोज्जा म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले केले तर आभार कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे यांनी मानले कार्यक्रम चे सूत्रसंचालन शुभम भालदंड सर यांनी केले.
या वेळी कार्यक्रमांस शाळेचे मुख्याध्यापिका सौ दीपिका कदम उपमुख्याध्यापिका सौ. संगीता गांगर्डे, सुपरवायझर दिपाली हजारे, शिक्षिका सौ रूपाली जोशी मॅडम, सौ आचल नेटके, सौ आरती हिवारकर व वैष्णवी नजन आदी उपस्थित होते.