ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशकात सुरू

नाशिक

द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे.

कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पस मध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली आहे. राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.

या विषयी अधिक माहिती देतांना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले की, जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही. इतकी या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे.

महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. या संधीचे रुपांतर ताकदीच्या मुल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सह्याद्री’ने ही सुरुवात केली आहे.

काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मुल्यसाखळ्या उभ्या करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स‘ भर देणार आहे.

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी

सह्याद्री’चा काजू प्रक्रिया प्रकल्प

प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता

देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प

प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी

काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट

उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन

परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे