ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्थांमधील १ लाख रुपया पर्यंतच्या ठेवींना संरक्षण… राज्य सरकारचा निर्णय

मुंबई

सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी पतंस्थाकडील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पतसंस्थांकडून ठेवीपोटी अंशदान घेण्यात येणार असून त्यातून हे संरक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात सुमारे २० हजार नागरी- ग्रामीण सहकारी पतसंस्था तसेच पगारदार नोकरांच्या पतसंस्था आहेत. या पतसंस्थामध्ये सुमारे तीन कोटी ठेवीदारांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

या ठेवींना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहकार कायद्यात सुधारणा करीत स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ गठीत करण्यात आले असून त्याला १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

या निर्णयानुसार एखादी पतसंस्था आर्थिक संकटात आल्यास किंवा अवसायनात गेल्यास ठेवीदारांच्या एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. त्यासाठी पतसंस्थांकडून प्रति वर्षी १०० रुपयांच्या ठेवीसाठी १० पैसे अंशदान घेतले जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या सुमारे तीन कोटी ठेवीदारांना लाभ मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे