HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये मोठी उसळी
आज मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली.

मंगवारी सकाळी मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली.
शेअर्सने मोठी झेप घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक निर्णय कारणीभूत ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली.
सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी येस बँकेचा शेअर 10.31 टक्के वाढीसह 25 रुपये 15 पैशांवर ट्रेड करत होता.
येस बँकेचा शेअर मागील सत्रात तो 22.80 रुपयांवर बंद झाला होता आणि आज 23.02 रुपयांवर सुरु झाला. या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी 26.25 रुपये आहे आणि सर्वात कमी पातळी 14.10 रुपये आहे.
दुसरीकडे, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घट पाहायला मिळत असून, त्यासह ट्रेड करत आहे. तो 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 1441 रुपयांवर आहे. सुरुवातीच्या व्यवहारात तो 1436.30 रुपयांपर्यंत घसरला होता.
येस बँकेने भागधारकांना दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे की, बँकेला आरबीआयकडून ५ फेब्रुवारीला माहिती मिळाली आहे की बँकेने एचडीएफसी बँकेच्या बँकेतील 9.5 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.