
राज्यातील किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सियस तापमान हाेते.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात सध्या वाढ झाली आहे. मात्र आता येत्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.