
शाळेच्या प्रवेशद्वारात आलेल्या प्रत्येक चिमुकल्याचे फुलाच्या पायघड्यांवरून चालत येऊन शिक्षकांकडून औक्षण करण्यात आले . तसेच खडीसाखरेने त्यांचे तोंड गोड करण्यात आले .
सगळीकडे फुलांची रोषणाई ,फुगे, सजवलेले फळे विद्यार्थ्यांना आकर्षित करत होते .विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळणी, घसरगुंडी तसेच बौद्धिक खाद्य म्हणून गोष्टीची वाचनीय पुस्तके ठेवण्यात आली होती .सुश्राव्य संगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांदीपन अकॅडमीचे माननीय श्री . बालाराजू करी भूषवले होते .परिवर्तन प्रतिष्ठानचे श्री. रवींद्र करंदीकर, उपाध्यक्षा योगिता चौधर मॅडम, सचिव डॉ. अनिकेत घोटणकर यांच्यासहित महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ . ज्योती केसकर, उपाध्यक्षा सौ विद्या होलेहुन्नूर या उपस्थित होत्या . आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक तसेच शालोपयोगी साहित्य यांचे वाटप करण्यात आले . मुख्याध्यापिका सौ सोनगरा यांनी प्रास्ताविक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अस्मिता शूळ यांनी केले. सर्व शिक्षिका वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .