ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्ताचा तुटवडा

छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्याची आरोग्यदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयासह इतर रुग्णालयांना सध्या रक्तटंचाईचा फटका बसत आहे. थॅलेसेमिया, डायलेसिस, ट्रामा आणि डिलिव्हरीसाठी येणाऱ्या रुग्णांना दररोज १५० ते २०० बॅग रक्त लागते.

त्यामानाने रोज १०० ते १२० बॅग रक्त जमा होत आहे. तसेच घाटीत गेल्या आठवड्याभरापासून ए आणि बी पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती साधारणतः मे – जूनमध्ये निर्माण होत असते.

परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात नियोजन करण्यात आलेले दोन रक्तदान शिबिर रद्द झाल्याने याचा फटका घाटी रुग्णालयाला बसत असल्याचे देखील बोलले जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्ताचा तुटवडा

घाटी रुग्णालयासह इतर रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे