
शेवगांव दिनांक 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी शहरातील आखेगांव रोड परिसरात एका कापुस खरेदी केंद्राला दुपारी 03 वाजता भीषण आग लागली.
आगीत शेकडो क्विंटल कापुस जळून खाक कारण समजले नाही. सुदैवाने जीवित हानी नाही. टेकाळे सोनावणे आणि मरकड असे या कापुस खरेदी केंद्राच्या मालकांची नावे असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.ज्यांचा कापुस आहे ते उघड्या डोळ्यांनी नुकसान पाहत होते. बहुतेक कापुस वाहून आणणाऱ्या वाहनाच्या सायलेंसर च्या स्पार्किंग मुळे कापसाने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
शेवगांव शहरातील नगरपरिषदेच्या मालकीचे अग्निशमन वाहन फायर फायटर नाही. त्यामुळे वरचेवर अशा घटना घडत असतात. आणि व्यापाऱ्यांचे लाखो कोटींचे नुकसान होत असते शेवगावकरांना नगरपरिषदेत कोणी वाली नाही.
ज्ञानेश्वर केदारेश्वर वृद्धेश्वर आणि गंगामाई या साखर कारखान्यांच्या मालकीच्या अग्निशमन वाहनांवर शेवगांव शहर अवलंबून आहे.