ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था चौकशीच्या विळख्यात

अहमदनगर

मार्कडेंय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संस्थेने वार्षिक ताळेबंद पत्रकामध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या थकीत कर्ज व्याज देण्याची तरतुद ही रक्कम रु.४,६१,९६, ३५५/- एवढी केलेली आहे.

यापुर्वीच्या वार्षिक अहवालामध्ये कोठेही अशा प्रकारची व्याज देण्याची तरतुदी केलेली नव्हती व नाही. या अनुषंगान असे निदर्शनास येते की, कर्जदार यांनी मागील तीन ते चार वर्षामध्ये थकीत कर्जाची व्याज भरलेली नाही अथवा संस्थेचे कर्ज मोठया प्रमाणात थकीत होवून संस्थेचा एन पी ए वाढलेला असल्या कारणामुळे संस्थेला आजपावेतो मिळालेल्या संपुर्ण नफ्याची तरतुद ही थकीत कर्जव्याज देणे म्हणुन करावी लागलेली आहे.

त्या अनुषंगाने संस्थेमध्ये कर्ज प्रकरण मोठया प्रमाणे थकीत असून संस्थेचे संचालक हे थकबाकीदार व कर्जदाराकडून कर्ज रक्कम वसुल करणेकामी पुर्णपणे निष्फळ ठरलेले आहेत. अशीच संस्थेची परिस्थिती राहिल्यास सदरची संस्था ही लवकरच अवसानात निघेल. सदरची संस्था ही अहमदनगर शहरातील गरीब, मोलमजुरी करणारे विडी कामगार लोकांची संस्था असून सदर संस्थेस अवसानापासून वाचविण्याकरीता व संचाक मंडळाचे अनागोंदी कारभारास लगाम लावण्याकरीता सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ८३ प्रमाणे चौकशी होणे आवश्यक वाटते.

तरी सदर संस्थेस अवसानात निघण्यापासून वाचविण्याकरीता आपल्या कार्यालया मार्फत योग्य ते चौकशीचे आदेश व्हावे असे तक्रार अर्ज संस्थेचे सभासद पुरूषोत्तम मल्लाय्या सब्बन यांनी दि. १९/०६/२०२४ रोजी मा. तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिलेले होते. सदर तक्रार अर्जानुसार मा.तालुका उपनिबंधक साहेब यांनी सदर मार्कडेंय नागरी सहकारी पतसंस्थेचे सन २०२३-२४ चे लेखा परिक्षण करण्यासाठी श्री आनंद ए गांधी अँड असोसिएटस (सी.ए.) यांची नेमणुक केलेली आहे.

तसेच महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम १९६० मधील तरतुद, महाराष्ट्र राज्य बिगरकृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ तसेच शासन वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकास आधीन राहुन तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कारवाई करुन त्याबाबत नोंदी लेखापरिक्षण अहवालात करण्यात येवुन लेखापरिक्षण अहवाल विहित मुदतीत मा. तालुका उपनिबंधक सहकारी संस्थेस सादर करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. त्यानूसार सदर मार्कडेंय नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी चालु आहे.
आपला
(श्री. पुरुषोत्तम मल्लय्या सब्बन)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे