ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पारनेरमध्ये अजित पवारांचा झंझावात

अहमदनगर -जिल्हा प्रतिनिधी, संगीता खिलारी

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेचच अजित पवार यांचा दौरा असल्याने अनेकांचे याकडे लक्ष होते.

उपमुख्यमंत्री अजित दादांनी शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सध्या ज्या योजना राबवत आहेत या योजनांमुळे शेतकरी व महिला वर्गाचा कसा फायदा होईल हे सांगितले.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण याविषयीही महिलांना समजावून सांगितले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना सद् घालत सांगितले की, तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचे वीजबील माफ केले असून आता यापुढे शेतकऱ्यांना म्हणून वीज हवी असेल तर सोलर पंप आता दिले जातील.

‌सोलर पॅनल विहीरजवळ बसणार असून त्यावर मोटार चालेल,दिवस उगवताच आठ वाजता सोलरचे पॅनल तापतील व तुमची मोटार सुरु होईल.लाईटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. संध्याकाळी सूर्य मावळला की मोटर बंद होणार त्यामुळे येथून पुढे रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ कोणत्याच शेतकऱ्यांवर‌येणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे