ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेवगाव तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधव क्रांतीदिनी संभाजीनगरला जाणार

अहमदनगर - संगिता खिल्लारी, जिल्हा प्रतिनिधी

दिव्यांगांना प्रति महिना ६००० हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. भूमीहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद महानगरपालिका मध्ये दिव्यांगांणा राजकीय आरक्षण द्या,सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा.दिव्यांगांची १० लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढा, दिव्यांगांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळावी. दिव्यांगांना लाईट बिल व कर या मध्ये ५०% सुट देण्यात यावी, बाजार समिती सहकार क्षेत्र साखर कारखाने यांच्यावर किमान एक दिव्यांगांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे इत्यादी मागण्या मान्य होण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेवगाव तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने या मोर्चा साठी नियोजन सुरू असून गावा – गावातील दिव्यांग बांधव यांच्या सोबत संपर्क करुन या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी तसेच प्रवासाची व्यवस्था सुरू आहे.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अ.नगर च्या महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, शेवगाव तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण अभंग यांच्या सह प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाचे प्रमुख पदाधिकारी याकामी नियोजन करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे