ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पदमशाली समाजाने घरटी एक झाड लावून बागुलपंडुगु सण साजरा करावा – श्रीनिवास बोज्जा

अहमदनगर

पद्मशाली समाजाचा बागुलू पंडुगू सण म्हणजेच बागेचा सण म्हणून गेल्या कित्येक वर्षा पासून आषाड महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेनंतर साजरा केला जातो. याही वर्षी हा सण समाजाने घरटी एक झाड लावून वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेऊन साजरा करावा असे आवाहन पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.

या महिन्यातील 26 जुलै रोजी हा सण साजरा होत असून पद्मशाली समाजामधील बागुलू पंडूगू हा सण मोठ्या थाटात माटात समाजातील सर्व घटक एकत्र येऊन अहमदनगर शहरातील बालिकाश्रम येथील मंदिरात , तोफखाना तेथे व सावेडी उपनगारातील श्रमिक नगर येथे साजरा केला जातो.

या दिवशी पदमशाली समाजातील लोक देवीला साकडे घालून प्रार्थना करून निसर्गाचे रक्षण करण्याचे तसेच पर्जन्यवृष्टी ही संतुलित प्रमाणात होण्यासाठी व दुष्काळ अगर अतिवृष्टी होऊ नये या साठी देवीला प्रार्थना केली जाते.

या सणाला बागेचा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असून महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या ठिकाणी पदमशाली समाजातील लोक राहतात. त्या त्या ठिकाणी त्यांचे सोयीने हा सण साजरा केला जातो अशी माहिती पद्मशाली पंच कमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे