ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पर्यावरण संतुलनासाठी ‘लक्ष्यवेध’ कडून वृक्षारोपण मोहीम

अहमदनगर

नगर व पुणे जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘लक्ष्यवेध’ मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या वतीने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम सुरु करण्यात आली असून या सोबतच ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमही राबविले जाणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन महेश भोर यांनी दिली.

या मोहिमेचा शुभारंभ शिंदेवाडी, घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संतुलन, वृक्षारोपणाचे महत्व या विषयी जनजागृती करून करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन महेश भोर,संचालक सुभाष आरडे, आकाश ढगे, प्रदीप जगताप, शाखा व्यवस्थापक नंदू थिटे, रोहित कोळपे, किरण नाणेकर, रवींद्र उबाळे, कालिदास निंभोरे, दिनेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, महेश पानसरे (पाटील), माजी उपसरपंच विष्णु खामकर, योगेश पानसरे, शिक्षिका सौ. सुवर्णा निंभोरे, सौ. सुनीता सोनवणे, संजय रायकर, सौ. सोनाली रणदिवे आदी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन महेश भोर ‘लक्ष्यवेध’ संस्थेच्या नगर जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह अन्य ठिकाणी शाखा असून संस्थेने नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळे संस्थेच्या ठेवीदारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जनतेच्या आर्थिक गरजा भागविण्याबरोबरच सामाजिक उपक्रमातही संस्थेच्या वतीने योगदान दिले जात आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल राखण्याची आज नित्तांत गरज असून त्यामुळे संस्थेने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे