36 प्रकारचे श्रीखंड पाईपलाईन, भिस्तबाग चौक येथे ‘द श्रीखंड स्टुडिओ’चा शुभारंभ
अहमदनगर

नाशिक येथील ‘द श्रीखंड स्टुडिओ’ श्रीखंडाचे 36 प्रकारच्या श्रीखंडाची निर्मित करत असून, या दालनाची शाखा नगरमध्ये पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक येथे नुकतीच सुरु झाली आहे.
या शुभारंभप्रसंगी नगरमधील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या, अशी माहिती दालनाच्या संचालिका कु.अबोली हडवळे यांनी दिली.
द श्रीखंड स्टुडिओ विषयी माहिती देतांना कंपनीचे संचालक मनोज बाप्ते म्हणाले, श्रीखंड ही भारतीय उपखंडातील एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. श्रीखंडामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक सामग्री आहे, तसेच एक छान सुगंध, चव आणि उपचारात्मक क्षमता आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून पाचन तंत्रास मदत करते.
द श्रीखंड स्टुडिओच्या माध्यमातून फळांचा आस्वाद असलेले वेगवेगळे श्रीखंड उपलब्ध करुन दिले आहे. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुटमध्येही अनेक व्हारायटीज् उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
द श्रीखंड स्टुडिओची मुख्य शाखा नाशिक येथे असून, पुणे येथे तीन, छत्रपती संभाजीनगर, जळगांव येथेही शाखा आहेत. नगरमधील शाखेस शुभारंभप्रसंगी मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हे 36 प्रकारचे श्रीखंड नगरकरांच्याही पसंतीस नक्कीच उतरतील, असा विश्वास व्यक्त केला.
या दालना विषयी माहिती देतांना अबोली हडवळे म्हणाल्या, नगरकर हे खाण्या-पिण्याबाबत चोखंदळ आहेत. त्यामुळे नगरमध्ये अनेक खाद्या पदार्थांची दालने नगरमध्ये आहेत. यात आता ‘द श्रीखंड स्टुडिओ’ने पदार्पण केले आहे.
या दालनात श्रीखंडाचे 36 प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. फळांच्या आस्वादासह ड्रायफ्रुटचे विविध प्रकार 100 ग्रॅम, 250 ग्रॅम व 500 ग्रॅम पॅकिंग या ठिकाणी उपलब्ध आहेत.
यात क्लासिक प्रकारात 3, फ्रुट फॅन्टॅसी प्रकारात 13, एक्सोटीक्स प्रकारात 3, प्रिमियम ड्रायफ्रुटस् प्रकारात 9, रॉयल प्रकारात 8, चॉकलेट अॅण्ड ब्रॉऊनिस प्रकारात 6 असे वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. तरी ग्राहकांनी या दालनास एकवेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अबोली हडवळे यांनी केले आहे.