ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कोतवाली पोलीसाची मोठी कारवाई अवध्या २ तासात मुद्देमालासह आरोपी ताब्यात

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- सागर सब्बन

नगर शहरात दि .१९ / ७/ २०२४ रोजी फर्यादी नामे सागर मिलिंद गायकवाड वय २४ वर्ष राहणार दुध सागर सोसायटी केडगांव अ.नगर यांनी फिर्यादी दिली की १७/७/२०२४ रोजी सकाळी ६.३० वा च्या सुमारास त्यांचे केळीचे गोडाऊनचे ऑफिस बंद करून ते मार्केटला गेला असता. त्यांचे गोडाऊनच्या ऑफिस अज्ञान चोरट्यानी कुलूप तोडून गल्लीतील १ लाख १० हजार रुपये चोरून नेले आहेत .

अशी फिर्यादी दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु र  1 ८१४ २०२४ बीएनएस कलम ३३१ {३} ३०५ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे अनुषयाने मा , पोलीस निरीक्षक , प्रताप दराडे यांचे गुन्हे शोध पथकाचे अंबलदार यांनी सदर गुन्ह्यांचा तत्काळ तपास करणे या बाबत आदेशीत केल्याने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारांस मार्फेत माहिती मिळाली की सदर गुन्हां हा फिर्यादी त्यांच्याकडे काही दिवसापूर्वी काम सोडून गेलेला कामगार यांनच केला असावा.

त्याप्रमाणे तपास केला असता काम सोडून गेलेला कामगार नाव चंद्रकांत दिगंबर इंगळे राहणार दुध सागर सोसायटी केडगाव अ.नगर त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता .

प्रथम त्याने मला काही माहिती नाही असे सांगितले. व त्यानंतर पोलीस गीरी दाखवतात , त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली . व लपवून ठेवलेली १ लाख १० हजार रुपये पंचासमक्ष काढून दिले आहेत . तरी पुढील तपास पो.ना. योगेश कवाष्टे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला , सो मा ,अप्पर पोलीस अधीक्षक ,श्री प्रशांत खैरे , सो , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्री अमोल भारती , सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे , पो.स.ई .प्रवीण पाटील व गुन्हांशोध पथकाचे पोलीस हे कोॅ योगेश भिंगारदिवे ,पो.हे काॅ गणेश धोत्रे ,पो . हे काॅ सूर्यकांत डाके ,पो.हे . काॅ .विक्रम वाघमारे ,पो.काॅ ,अविनाश वाघचौरे ,पो .ना. समिर शेख पो .काॅ .अभय कदम , पो . हे. कोॅ, अमोल गाडे ,पो ,कोॅ , संतोष शिंदे , पो ,काॅ ,सुजय हिवाळे ,पो.काॅ . दिपक रोहकले ,पो .काॅ . तानाजी पवार यांनी सदरची कारवाई केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे