अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅट्ट्रीक

लोकसभा निवडणुकींच्या निकालाआधी देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ईशान्येकडील राज्यांमधील विधानसबा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील.
१९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएमने १७ जागा जिंकल्या होत्या.तर एसडीएफला १५ जागा मिळाल्या होत्या एक्झिट पोलनुसार राज्यात एसकेएम पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेशमध्येही १९ एप्रिल रोजी विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला आघाडी मिळाली आहे. कारण, येथे १० जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मु्ख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चौना में यांनी आधीच आपपल्या जागा जिंकल्या आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अरुणाचल प्रदेशात ४१ जागा जिंकल्या. जनता दल (युनायटेडने) सात, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाच, काँग्रेस चार आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल एक जागा जिंकली.