अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन
वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठमोळे सिने दिग्दर्शक क्षितीज झरपकर यांचे निधन झाले आहे. त्यांची प्राणज्योत वयाच्या ५४ व्या वर्षी माळवली आहे. त्यांचे निधन कर्करोगामुळे झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
रविवारी (५ मे) सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगासोबत झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यामुळे क्षितीजला हृदयविकाराचा झटका आला होता. रविवारी दुपारी ३:३० वाजता झारापकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
क्षितिज झारापकर यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.
क्षितीज झारापकर यांनी आपल्या लेखनातून, अभिनयातून आणि दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. ते “चर्चा तर होणारच” या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते.
या नाटकामध्ये त्यांच्यासोबत आदिती सारंगधर आणि अस्ताद काळे मुख्य भूमिकेत होते. क्षितीज झारापकर यांनी आपल्या सिनेकारकिर्दित गोळा बेरीज, धुरंधर भातवडेकर, हुतात्मा, ठेंगा सारख्या अनेक कलाकृतींचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच अनेक चित्रपटांतही प्रमुख भूमिका साकारली आहे.