ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण..

उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.

मे महिन्याची सुरुवात होऊन आठवडाही पूर्ण झाला नाहीये. तरीहीदेखील उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. उष्मामुळं आणि घामाच्या धाराने हैराण झालेल्या नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळं तब्येतीच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत.

मुंबईकर या काही दिवसांपासून पोटाच्या इन्फेक्शनमुळं हैराण झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात दररोज 31 लोक गॅस्ट्रोसारख्या संसर्गाने रुग्णालयात दाखल होत आहे. शहरातील सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयातही पोटाच्या संसर्गाने हैराण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

जेजे रुग्णालयातील आरोग्य विभागाचे युनिट हेड मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये जवळपास 300 रुग्ण गॅस्ट्रोसारख्या आजाराने ग्रस्त आहेत.

अतिसार, अलटी, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांनी हैराण झालेले रुग्णांना दाखल करण्यात आले होते. 4 ते 5 दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरा होतो. तर, ओपीडी बेसिसवर 2 दिवसांत रुग्ण बरा होतो.

मुंबईत स्ट्रीट फुड किंवा जंक फुड मोठ्या आवडीने लोक खातात. रस्त्यालगत असलेले किंवा बाजारातील हातगाड्यांवर मिळणारे, वडापाव, समोसे, चायजीज भेळ, पाणी पुरी, फ्रुट प्लेट हे मोठ्या आवडीने लोक खातात. मात्र, या हे खाद्य पदार्थ व पेय कशा पद्धतीने बनवले गेले आहे, याचा विचार मात्र लोक करत नाहीत. कोणत्या तेलात हे पदार्थ तळले आहेत. याचा विचार मात्र लोक करत नाहीत. तसंच, हे खाद्य पदार्थ झाकून ठेवण्यात आले आहेत का, याकडे ही लक्ष देत नाहीत. रस्त्यालगत किंवा स्टॉल्सवर खाद्यपदार्थ व पेयपदार्थ उघड्यावरच विकले जातात.

त्यामुळं गाड्यामुळं होणारं प्रदूषण, रस्त्यावरची धुळ, घाण येथे घोंगावणाऱ्या माशा या पदार्थांवर जाऊन बसतात. दुषित अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटात संसर्ग होतो त्यामुळं इन्फेक्शन होण्याचीही भीती असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे