
रमजान हा जगभरातील मुस्लिम बांधवांचा उपवास करण्याचा इस्लामी पवित्र महिना आहे. सध्या रमजानचा शेवटचा आठवडा आहे. बाजारपेठ खरेदीसाठी गर्दीने फुलत आहे. कोठला भागात रोजा इफ्तारीच्या खरेदीसाठी गर्दी असते. फळांच्या गाड्या तसेच विविध विविध खाद्यपदार्थचे स्टॉल लावलेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कडाक्याच्या उन्हाळ्यात उपवास असल्यामुळे मसालेदार खाद्यपदार्थांपेक्षा फळांना ४० टक्के मागणी वाढल्याचे दिसत आहे.
इफ्तारीची वेळ झाल्यावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रार्थना करून इफ्तार करतात. उपवास सोडण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मसालेदार पदार्थांऐवजी फळांचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे.
त्यामुळे बाजारात खजूर, केळी, टरबूज, कस्तुरी खरबूज, पेरू आणि संत्री यांसारख्या पोषक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना प्राधान्य देत आहेत. ही फळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत.