राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल खरेदी -विक्री केंद्र उभारणार-राधाकृष्ण विखे-पाटील

राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘फुल खरेदी -विक्री केंद्र’ उभारणार असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. या बाजार समितीच्या विस्तारासाठी शासनाकडून 9 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. शेती मालाच्या निर्यातीसाठी शिर्डी विमानतळावर कार्गो हब निर्माण केले जाईल असेही मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मंत्री विखे-पाटील यांची उपस्थिती हाेती. या बाजार समितीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक मंडळाने विखे पाटील यांचा सत्कार केला. त्यावेळी विखे-पाटील यांनी शेतकरी सभासदांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्य सरकारच्या वतीने राहाता बाजार समितीला शेती महामंडळाची 9 हेक्टर जमिन हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेत आंतरराष्ट्रीय फुल खरेदी – विक्री केंद्र उभारले जाईल.