
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या माध्यमातून ममता गड्डम आपल्या अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना फॅशन डिझायनिंग चे प्रशिक्षण देत असून याद्वारे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे असे गौरवोद्गार नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी काढले.
सावेडीतील पाईपलाईन रोड भिस्तबाग परिसरातील कसबे वस्ती, पंचरत्न नगर येथील अनुजा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बारस्कर बोलत होत्या. ममता मॅडम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून वीणा बोज्जा, सुजाता उमालूटी, कमल पवार, सुभाष गड्डम आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण केंद्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिलांचा तसेच केंद्राला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.