AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित विविध क्षेत्रातील महिलांचा ती चा सन्मान सोहळा २०२४ उत्साहात पार पडला.
अहमदनगर मधील हा पहिला एकमेव कार्यक्रम १०० महिलांचा विविध क्षेत्रातील , जिल्ह्यातील सन्मान झाला - माननिय मोहिनी राज गटणे...

अहमदनगर मध्ये लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांना ती चा सन्मान सोहळा २०२४ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी आपल्या कार्याने जगभरात आपल्या देशाचे, शहराचे नाव उंच शिखरावर नेणाऱ्या ती चा सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील विशेष महिलांच्या कार्या चे प्रस्ताव मागविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जवळ जवळ १०० महिलांनी सहभाग नोंदविला होता.
त्या आधी श्रुती मॅडम नी गेले 2 महिना भरापासून खुप कष्ट घेऊन हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आधी त्यांचे अभिनंदन करुया…
अहमदनगर मध्ये एन्ट्री केल्यावर सगळीकडेच चौका चौकात कार्यक्रमाचे बॅनर बघून खूप आनंद वाटतोय.. असे महिलांचे उद्गार होते…
कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री.मोहिनीराज गटणे – Z मराठी वरील फेमस सिरियल – तुला पाहते रे. यांचा हस्ते पुरस्कार वितरण सोहळा तसेच महिला मान्यवरांच्या उपस्थितीत मा. सौ. धनश्री ताई सुजयदादा विखे पाटील अध्यक्ष सिंधू ताई ए. विखे पाटील रणरागिणी महिला मंडळ, अहमदनगर.मा. सौ. डॉ. सुधा कांकरिया अध्यक्षा बेटी बचाव अभियान अहमदनगर.मा.सौ. भावना तिवारी महिला आघाडी सोशल वर्कर – जिल्हा – मुंबई.मा. सौ. निलांबरी भट प्रोफेशनल कंटेंट राईटर, ब्लॉगर, ब्लॉगर – जिल्हा – सांगली. मा.सौ. मधुरा वैद्य – झावरे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर.कु. अंजली व नंदिनी गायकवाड इंडियन आयडॉल विजेते, सिने अभिनेत्री सिमा कदम – सप्रे संचालिका AS युनीसेक्स सलोन,आदि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला…
दिपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत केले.
माननीय मोहिनी राज गटणे सर त्यांच्या मनोगतात म्हणाले की ती चा सन्मान हा झाला च पाहिजे.. ती आहे म्हणून सगळं जग चालते. ती चे एक अस्तित्व आहे.. आता या कार्यक्रमात १०० महिलांचा सन्मान होणार आहे म्हणून महिलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपल्या घरात दोन बायका एकत्र राहत नाही. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दर्शविली आहे.हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.
माननीय सुधा कांकरिया मॅडम व मधुरा वैद्य – झावरे त्यांच्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की खरंतर आज मी खुप च बिझी होते.. पण १०० महिलांचा सन्मान होणार म्हणून मी मनापासून उपस्थित राहिले..
आपण चार बायका एकत्र येऊन फक्त गाॅसिप करतो. कामा साठी एकत्र येऊन ही काम कमी इतर गोष्टी जास्त बोलत असतो. त्या बरोबर च सुधा कांकरिया यांनी स्त्री जन्मा चे स्वागत का करावे, बेटी बचाव अभियान चे फायदे समजावून सांगितले. आणि शपथ घेऊन त्यांचे मनोगत संपवले. आणि १०० महिलांच्या सत्काराला सुरुवात झाली.
सत्काराचे स्वरूप- ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि पुस्तक, फेटा आणि प्रत्येक महिलेची मुलाखत, फोटोसेशन…हे सगळ बघून महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता..
व त्या सोबत पलक ज्वेलर्स कडून ५ राणीहार लकी ड्रॉ कुपन काढून ५ विजेते काढण्यात आले. तसेच AS सलोन कडून ५ कुपन विजेते जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमासाठी आलेल्या १०० महिलांसोबत त्यांचे फॅमिली ही खुप आनंद व्यक्त करत होती.. काही महिलांनी केलेली गाणी मनोरंजन व सोबत फुड्स स्टॉल चा ही आनंद घेतला.
आणि शेवटी AR न्यूज टिम नी सर्वांचे आभार मानले.