
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेचच अजित पवार यांचा दौरा असल्याने अनेकांचे याकडे लक्ष होते.
उपमुख्यमंत्री अजित दादांनी शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सध्या ज्या योजना राबवत आहेत या योजनांमुळे शेतकरी व महिला वर्गाचा कसा फायदा होईल हे सांगितले.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण याविषयीही महिलांना समजावून सांगितले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना सद् घालत सांगितले की, तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचे वीजबील माफ केले असून आता यापुढे शेतकऱ्यांना म्हणून वीज हवी असेल तर सोलर पंप आता दिले जातील.
सोलर पॅनल विहीरजवळ बसणार असून त्यावर मोटार चालेल,दिवस उगवताच आठ वाजता सोलरचे पॅनल तापतील व तुमची मोटार सुरु होईल.लाईटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. संध्याकाळी सूर्य मावळला की मोटर बंद होणार त्यामुळे येथून पुढे रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ कोणत्याच शेतकऱ्यांवरयेणार नाही.