अहमदनगरमध्ये मतमोजणी परिसरात दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत ‘राडा’पोलिसांचा लाठीचार्ज
अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर लोकसभेची मतमोजणी एमआयडीसी परिसरात सुरु आहे. येथे सर्वच कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. यामध्ये सध्या शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे व दक्षिणेत निलेश लंके हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
दरम्यान या एमआयडीसी परिसरात कार्यकर्त्यांत ‘राडा’ झाला असल्याचे वृत्त आले आहे. दोन गटात येथे धक्काबुक्की झाली. एका कर्यकर्त्यासह गाडी देखील फोडण्यात आली आहे. यामध्ये दोन गटात वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत लाठीचार्ज देखील केला असल्याची माहिती समजली आहे.
कांटे की टक्कर
अहमदनगर लोकसभा मतदार संघात अद्यापही निलेश लंके व सुजय विखे यांच्यात कांटे की टक्कर दिसून येत आहे. शिर्डीमध्ये पहिल्यापासूनच वाकचौरे हे आघाडीवर होते. दक्षिणेत मात्र कधी विखे तर काही लंके हे आघाडीवर दिसून येत होते. २१ फेरी अखेर निलेश लंके हे आघाडीवर होते.
निकालास आठ वाजतील
साधारण रात्री ८ तरी हा निकाल यायला लागतील असे म्हटले जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभेचा जो निकाल आहे तो राऊंड नुसार होणार आहे. फेऱ्या अनेक आहेत. नगर शहरासाठी कमीतकमी २१ राउंड आहेत.
तर जास्तीत जास्त राउंड २७ आहेत. त्यामुळे जर एका फेरीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारण अर्धा तास पकडला तरी परिपूर्ण निकाल यायला साधारण ८ ते ९ तरी वाजतील असा अंदाज आहे.