ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणपत पाटील नगरमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीचा वीज देण्यास नकार

मुंबई

दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर हे सीआरझेड क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात येत असल्यामुळे संबंधित कायद्यांच्या निर्बंधानुसार अदाणी इलेक्ट्रिसिटी तेथे वीज पुरवठा करू शकत नाही, असे स्पष्टीकरण अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबईतर्फे देण्यात आले आहे.

यासंंदर्भात काल काही पक्षांतर्फे अदानी इलेक्ट्रिसिटीविरुद्द मोर्चा काढण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने २०११ मध्ये येथील अतिक्रमणे तोडताना कायदेशीर वीज जोडण्या देखील काढून टाकल्या होत्या.

हा विभाग वनक्षेत्रात असल्यामुळे सीआरझेड प्राधिकरण, वनविभाग, महापालिका आणि स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडून वीज जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाने खारफुटी क्षेत्रात सर्व कामांवर बंदी घातली असल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी गणपत पाटील नगरात नवीन वीज पुरवठा जोडणी देऊ शकत नाही. महापालिकेने देखील येथे वीज जोडणी देण्यास प्रतिबंध केला आहे.

अशा स्थितीत आम्ही तेथे खांब उभारू शकत नाही, वीज वाहिनी टाकू शकत नाही किंवा बांधकामही करू शकत नाही, असेही अदानी इलेक्ट्रिसिटीने पत्रकात म्हटले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे