
मागील 2 दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 10 अंशांच्या पुढे गेला आहे. मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशासह राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.