
भारतीय पर्यटन विकास को-ऑप सोसायटी लि. ही महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव अशी पर्यटन राज्यस्तरीय संस्था म्हणून कार्यरत आहे.
संस्थेच्या व्यवस्थापन समितीची पहिली पंचवार्षिक निवडणूक दि. ०८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता, सहकार महर्षी साहेबराव सातकर सभागृह, पुणे जिल्हा सहकारी बोर्ड कार्यालय, शुक्रवार पेठ, पुणे या ठिकाणी पार पडली.
सदर निवडणूक प्रक्रिया श्री. विलास लिंबळे साहेब (सहकार शिक्षणाधिकारी, मा. उपनिबंधक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मार्या, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ७६ ला अनुसरून, भारतीय पर्यटन विकास को-ऑप सोसायटीच्या १३ सभासदांची “ संचालक” पदी बिनविरोध निवड झाली यामध्ये श्री. प्रविण घोरपडे, हेमंत जानी, सिराज शेख, प्रथमेश कुलकर्णी, चंद्रजित पठारे, संतोष माने, सजेश पिल्ले, सुरेंद्र कुलकर्णी, पूजा खरटमल, संगिता कळसकर, स्नेहल गायकवाड, हर्षद खोंडे आणि आशिष हिंगमिरे यांची संस्थेच्या कार्यकारिणी साठी सन २०२४ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी नमूद केलेल्या मतदार संघातून बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्राच्या विविध भागातून सर्व सभासद निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, यावेळी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी हे सभासदांकडून अनुमोदन करण्यात आले.