ब्रेकिंगमहाराष्ट्र
तलाठी भरती परीक्षेत घोळ , प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ११४ चुका

विविध कारणांनी बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेत पहिल्यापासूनच विविध अडचणी, अडथळे येत आहेत. हे सर्व अडथळे पार केल्यानंतर आता परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरे यात घोळ झाल्याचे समोर आले आहे. ही बाब परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने देखील मान्य केली आहे. या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख खात्याने ‘त्या’ प्रश्नांबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.