ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव , नागरिक वातावरणामुळे आजारी

अहमदनगर

गारपिटीच्या पावसाने निघोज परिसरात झालेली अपरिमित हानी झाली असून, यातून शेतकरी सावरत असताना दररोज सकाळी पडणाऱ्या धुक्याने संपूर्ण शेती व शेतातील पिकांवर रोगांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे तर नागरिक या विषम वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

निघोज, पठारवाडी, जवळा, राळेगण सिद्धी, वडुले, सांगवी सुर्या, गटवाडी, गुणोरे व परिसरात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या पावसाने शेतीची अपरिणीत हानी झाली आहे. यातून शेतकरी सावरत असतानाच सध्या दररोज पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत पडत असलेले धुके व दवबिंदूने शेतातील उरली, सुरलेली पिकेही धोक्यात आली आहेत.

सध्या शेतात असलेली कांदा, गहू, हरबरा, ज्वारी, ही पिके व डाळींब, द्राक्ष व इतर फळबागा जगविण्यासाठी खर्चिक असलेल्या रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

गारपिटीचा पाऊस व आता पडत असलेल्या धुक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्य शासनाने गारपीकग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले; परंतू त्यासाठी ऑन लाईन फॉर्म भरणे,

तलाठी व सर्कल पंचनामे इतर कागदपत्रे सादर करणे, अशा किचकट प्रक्रियाने ‘भिक नको, पण कुत्रं’ आवर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मागील वर्षीच्या पावसाने झालेली नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नसताना, आता तरी मिळेल का ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचाल जात आहे.

सध्या पडत असलेल्या धुक्याने पहाटेचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या धुके व दवबिंदूमुळे हवेत गारठा निर्माण होत होऊन नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे