
व्यावसायिकाला दोन अनोळखी लोकांनी मारहाण केल्याची घटना नगर-मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव परिसरात घडली. शिवम राजेंद्र उदारे (रा.बकेदारे मंगल कार्यालयाशेजारी, भिंगार) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
उदारे हे बोल्हेगावातील राजयोग इलेक्ट्रिक दुकानातून नगर-मनमाड रस्त्याने घरी जात असताना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी उदारे यांना अडविले. एकाने उदारे यांची कॉलर पकडून एकाने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांनी उदारे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार नेहुल गुन्ह्याचा तपास करीत आहेत.