ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा जाणार दुबईला..

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी अनेक उपाययोजना अंमलात आणल्याने येथील बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा आता दुबईच्या बाजारात जाणार आहे.

यासाठी कार्ले यांनी बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कांदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तशी सोय केली असून, कंटेनरमधून ३० टन कांदा दुबईकडे जाणार आहे.

या कांदा निर्यातीतून शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकचा भाव मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा जामखेड बाजार समितीते विक्रीसाठी आणावा असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, संचालक डॉ. गणेश जगताप, संचालक राहुल बेदमुथ्था, संचालक सचिन घुमरे, कांदा व्यापारी आबुशेठ बोरा, पिंटूशेठ खाडे, हनुमंत खैरे, दादा काळदाते, कृष्णा खाडे, मारूती काळदाते, पप्पूशेठ काशीद, कर्मचारी धोंडूराम कवठे, मारूती जाधव आदी उपस्थित होते.

बाजार समितीकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक सुविधा पुरवण्यात येत असून, या माध्यमातून खर्डा येथे गोडाऊन, शेळ्यांचा बाजार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा फायदा घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली प्रगती करावी, असे आवाहन सभापती कार्ले यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे