ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी.

पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी,  (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला.

गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गारपिटीमुळे पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना पारनेरात घडली.

आधीच विविध जाचक अटींमुळे पोल्ट्री व्यायसायिक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आणि त्यात आता अस्मानी संकटाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुठे घडली घटना ?

निघोज येथील रहिवासी पांडुरंग पवार यांचे पोल्ट्री शेड आहे. यात ९ हजार पक्ष्यांची क्षमता आहे. रविवार सायंकाळी ४ वाजता जोरदार गारपीट होत अस्मानी संकट कोसळले.

या गारपिटीने ५ हजार पक्षी मृत्यूमुखी पडून मोठी हानी पवार यांची झाली. वाऱ्याने शेडचे पडदे देखील फाटले होते. या शेतकरीसोबतच तालुक्यातील विविध ठिकाणच्या पोल्ट्री व्यवसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती समजली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे